जय जय सदगुरू पुंडलिका । देई तव प्रेम प्रभो ।|धृ
॥
गोरेगांवी देही विदेही । ध्यानी मनी भगवान ॥ मुंगसाजी सदगुरू कृपेने ।
ब्रम्हास्वरुपी रममान ॥१॥
धन्य खंडुजी धन्य मंजुळा । संसारी गुणगाण ।। कुशी तयाच्या अवतरलाशी ।
सगुण रुप तव ध्यान ||२||
भक्त जना आधार तुझाची। कनवाळू गुरुराज ॥ नाम तुझे मंगलमय गाता ।
रक्षण करशी
लाज ॥३॥
थोर तुझा महिमा गुरुराया । सर्व सुखाचे धाम ।॥ अंत न लागे
सामर्थ्याचा । व्यापक आत्माराम ||४||
सोडूनी या भावबंधन देई । तवचरणासी आस ॥ओवाळीतो आरती दयाळा शरणागत
प्रभूदास ॥५॥
आरती डाउनलोड करन्या साठी क्लिक करा
ओडिओ साठी ईथे क्लिक करा
