श्री पुंडलिक बाबा, मुर्तिजापुर (भाग-२)

 

राधाकिसनबुवांना देव गवसला:

 

श्री राधाकिसनबुवांचे संपूर्ण नाव राधाकिसन मारुती मोरे, मुर्तिजापूर मधील 'हिपटा' या खेडेगांवी एका वतनदार पाटील घराण्यात सन १९०५ मध्ये यांचा जन्म झाला. परिस्थिती पालटून आलेल्या गरीबीमुळे मोलमजूरीची कष्टाची कामे करुन ते उदरनिर्वाह भागवू लागले. शिक्षण अवघे चार इयत्ता पर्यंतच घेता आले. पुढे वयाच्या विसाव्या वर्षी योगायोगाने संत श्री गाडगेबाबांची गाठ पडून जीवनाला योग्य दिशा मिळाली. त्यांनीच आपल्या मुर्तिजापुर गोरक्षणसंस्थेत त्यांना काम देवून संसार परमार्थाचा रस्ता सुलभ करून दिला. लवकरच त्यांच्या पत्नीचे निधन घडल्यावर त्यांचे सर्व लक्ष पूर्णपणे ईश्वरदर्शनाकडे ओढ घेऊ लागले. संत गाडगेबाबा त्यांचे परंपरेतील किर्तनकाराबरोबर भजनसाथ करीत ते दिवस घालवू लागले. पण नुसत्या भजनकिर्तनाने त्यांचे समाधान होता ते देव केव्हा, कसा भेटेल ?’  म्हणून संत गाडगेबाबांना विचारू लागले. तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितले, "तू भजन किर्तन करीत गावोगावी जा तेथील संताचे दर्शन घेत रहा. जेव्हा तुला माझ्यापेक्षा श्रेष्ठ संत भेटेल त्यालाच तू खूशाल देव मान."

 

संत गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणेच गावोगावी किर्तन भजन करीत सन १९४६ मध्ये सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीस भरणार्या नामसप्ताहासाठी श्री राधाकिसनबुवा आपले स्नेही श्री माधवराव वंजारीबुवा यांच्या किर्तनात साथ करण्यासाठी कुटासा येथे प्रथमच आले. रात्रीच्या किर्तनापूर्वी दिवसा गावातून फेरफटका मारण्याच्या उद्देशानी बाहेर पडलेल्या राधाकिसनबुवांना गावातील काही जणांनी तळ्यात डुबत राहणाऱ्या त्या वेड्या पुंड्या ' विषयी सांगितले. वर्णन ऐकताच रायाकिसनबुवा लगबगीने प्रथम त्या तळ्यासमोरच येऊन त्या वेड्या पुंडयाला निरखून पाहू लागले. त्यावेळी पाण्यातील खेळ आटोपून श्री पुंडलिकदेव ही तळ्यातून बाहेर पडत त्या राधाकिसनबुवा समोर उभे राहून त्यांचे नजरेलानजर भिडवीत म्हणू लागले."आमचे पाय धुवाना दुवा, आम्ही कृष्ण आहो बुवा, गाडगेबाबा काय म्हणे ? आमचे पाय धुवा ना बुवा." संत गाडगेबाबांच्या भेटीची गुप्त गोष्ट प्रगट करीत अल्पवयाचे श्रीपुंडलिकदेव मोठ्या अधिकारवाणीने स्वतःगोपालकृष्ण असल्याचे सांगून पाय धुण्याची आज्ञा देताना पाहून राधाकिसनबुवांचे सर्वसंशय क्षणात मिटून त्यांच्या देवत्वावियी ठाम अनुभव येऊन ते त्यांचे चरणकमल भक्तिभावनेने घुवू लागले. विनम्रतेने माथा टेकवून श्री पुंडलिकदेवांचे मनोमनी ध्यान करीत आपली बरीच दिवसाची देव पहाण्याची इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात ते मुक्कामी येऊन पोहोचले.

 

रात्री श्री माधवराव वंजारी बुवाच्या किर्तनाआधी थोडा वेळ किर्तन करण्यासाठी तेथील संयोजक श्री हनुमान शेठ माहेश्वरी यांची परवानगी घेवून श्री राधाकिसन बुवानी किर्तन सुरु केले. त्यांना अपेक्षा नसतांनाही सकाळीच श्रीपुंडलिक देवानी सुचित केल्याप्रमाणे त्यांना या किर्तनाची संधी मिळाली त्यांचे ते किर्तनही संयोजकांसह सर्वाच्याच पसंतीला उतरले. त्यांनी किर्तनातुन जाहीरपणेच सकाळचा अनुभव सांगुन श्री पुंडलिक देवाच्या बाह्यकृतिने शंकीत होता त्यांचे खरे देवत्व जाणून घेवून त्यांची मनोभावे सेवा करून सर्वानी आप आपले कल्याण करुन घ्यावे असे स्पष्ट शब्दात सांगीतले. ते ऐकुन सर्व गावकरीच आता मोठ्या श्रध्देने श्री पुंडलिक देवाकडे पाहू लागले.एक दोन वर्ष तेथे राहुन श्री पुंडलिक बाबा श्री खंडुनानासह परत गोरेगांवी आले.

 

सदगुरुंची अपूर्व भेट:

 

"जगात पिशाच्च, अंतरी शहाणा सदा ब्रम्ही जाणा निमग्र तोया संत तुकारामाच्या अंभोगोक्ती नुसार युवावस्थेतील श्री पुंडलिकबाबांची रहाणी वर वर पाहता जगाशी पुर्णत: विसंगत दिसे, दिवस रात्र मनःपूत हिंडणे, भूक लागल्यास कोणाकडेही चार घास खाऊन निश्चिंत राहणे, काटेपुर्णा नदीतीरी, शेतीवाडीतून, उन-पावसात निश्चिंत भ्रमण करणे अंगावरील कपडे दाताने चावून-चावून फाडून टाकणे, कोणाच्याही घरी जाऊन वाटेल ते सामान इतस्ततः फेकून देणे, गाडगी, मडकी फोडुन टाकणे वगैरे सर्व काही प्रकार नित्यशाहा सुरु असत. श्री उरकाभाऊ मात्र ठाम विश्वासाने त्यांना देव माणुन ते कोठेही घाणीत, गाईबैलांच्या गोठयात वा गटारीच्या सांडपाण्यातुन अस्वच्छ अंगाने लिबिडलेले असले तरी कोणाचाही विचार करता आपल्या पाठकुळीस घेऊन घरी आणुन त्यांची यथा सांग पुजा केल्या शिवाय रहात नसत. श्री अंगदराव वगैरे इतर काही निवडक गावकरी पण श्रध्देने त्यांना पुजीत असले तरी त्यांच्या एकंदर बाह्य वर्तणूकी मुळे अनेकांच्या तक्रारी दररोज श्री खंडुनाना मंजुळा मातेला ऐकुण घ्याव्या लागत. त्यांनाही आजपर्यंतचे लोकांचे दिव्य अनुभव ऐकले तरीही आपला मुलगा या नात्यांने त्यांचे कड़े पाहतांना त्यांचे देवत्व ध्यानी येता त्यांच्या विचित्र वागणूकी मुळे हा वेडा तर नसेल ना ?' या चिंतेने त्या दोघांची मने आतून सारखी तळमळत असत. श्री खंडुनानाचे प्रथम पासूनचे भक्ती मार्गी जीवन आता अधिकाधिक विरक्तिने संसारापेक्षा परमार्थी जास्त रंगुन जाई. शेती वाडी वगैरे पैकी अन्नदान देवधर्मातच खर्च करीत राहुन नविन उत्पन्न वाढीकडे पुर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे दिवसें दिवस पैसे संपून लवकरच गरिबीचा सोहळा घरी साजरा होऊ लागला माता मंजुळाबाई सारजाबाई इथे तिथे राबून कसे तरी घर खर्च भागवित. श्री पुंडलिक बाबा नंतर नारायण, चंद्रकला, ही अपत्येही खंडुनानांना लाभली होती. श्री पुंडलिकाच्या चिंतेने व्याकुळ राहून ते आपल्या समवयस्क सज्जन मित्रांना, थोरविचारी माणसांना ह्या बाबत विचारु लागले त्या वेळी योग्य ज्योतिषास दाखवा अगर अधिकारी संत सत्पुरुषा कडे दर्शनासाठी घेऊन जाण्याचा सल्ला त्यांना मिळू लागला.

 

त्या वेळी अवघ्या विदर्भप्रांती यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील धामणगांव (देव) येथील परमपुज्य भगवान परमहंस श्री. मुंगसाजी महाराज यांची फारच किर्ती पसरली होती. त्यांच्या असामान्य लोकत्तर दैवी सद्गुणांमुळे त्यांना साक्षात देव समजुनच त्यांची पूजाअर्चा केली जात असे. अगदी सामान्य गरीबांपासुन ते थेट श्री राजदरबारी प्रतिष्ठीतांसह अनेका आनेक भक्त असलेल्या ह्या महापुरुषा कडे परमार्थातील नामवंत थोर संत सत्पुरुपात आदराने पाहात असत. सन १९३५ मध्ये सालबर्डी येथे केलेल्या भव्य यज्ञ समारंभ प्रसंगी खुद राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांची प्रमुख अग्रपुजा करुन वंदन केले होते. देश परदेशात स्वतःला अवतार म्हणुन घोषीत करणार्या श्री मेहरबाबानी पण समक्ष धामणगांवी येवून त्यांचे चरणकमळ मनोभावे पुजीले होते. अशा या सर्वमान्य सत्पुरुषाच्या पायावर आपल्या बाळ पुंडलिकास घातल्यावर निश्चितच त्याचे कल्याण होईल या विचाराने श्री खंडुनाना त्याबाबत चिंतन करीतच झोपी गोले. रात्री झोपेत त्यांना एका शुभ उमदा घोड्यावर अगदी ऐटीने बसुन बाळ पुंडलिक धामणगांवाशी निघाल्याचे द्रुष्य दिसले. बाळ पुंडलिकाला हाथी धरुन सौ. मंजुळाबाई चि. नारायण, चंद्रकला यासह श्री खंडुनाना रेल्वेने सांगली स्टेशनवर उतरून तेथून धामणगावी येवून पोहचले.

 

नेहमी प्रमाणेच बंगळीवर बसलेल्या भगवान परमहंस श्री मुंगसाजी महाराजांच्या दरबारी अनेकानेक नवेजुने भक्त हाती पुष्पमाला घेवून मोठ्या भक्ती भावाने त्यांचे पुजन करीत होते. श्री खंडुनाना बाळ पुंडलिकांसह तेथे पोहचताच इतका वेळ धरलेला हात हिसडा मारून सोडून घेऊन श्री पुंडलिकबाबा थे भगवान श्री मुंगसाजीच्या बंगळीवर चढून गादीवर त्यांच्याच अगदी जवळ जावून बसले. ते पाहताच श्री खंडुनाना नंतर भितीने कापू लागले. जवळचे सेवेकरी भक्त मंडळीही त्या मुलास रागे भरुन गादीवरुन खाली उतरण्यासाठी सांगूलागले. तोच श्री खंडुनाना भगवान श्री मुंगसाजीच्या पायावर डोके ठेवून पुंडलिका विषयीची तक्रार सांगत, यावर कृपा करुन शहाणा करा अशी प्रार्थना करु लागले, "धनगराला रत्न गवसले काय पारख त्याला ? हार मेंढीच्या गळ्याला. अरे हे अमूल्य रत्न आहे. हे केवळ माझेच स्वरुप आहे. याचे जतन कर भगवान् श्रीमुंगसाजींच्या अमोल वाणीने श्री खंडुनानांसह सर्वच उपस्थितांच्या डोळ्यात सुयोग्य अंजन पडुन ते सर्वजन श्री मुंगसाजी सह श्री पुंडलिकांचेही अत्यंत श्रध्दा भक्तीने दर्शन घेवूलागले. श्रींखंडुनाना श्री पुंडलिक बाबांना तेथेच ठेवून सौ मंजुळा मुलासह गोरेगावी परतले.

 

श्री भगवान मुंगसाजी महाराजांच्या त्या पवित्र नगरी मध्ये श्री पुंडलिकबाबाही स्वैर संचार करीत राहू लागले, अचानक एके दिवशी श्री मुंगसाजी देवांनी आपले परम भक्त श्री यशवंतराव राजे घाटगे (बडोदा) यांना आज्ञा करून श्री पुंडलिक बाबांना यथासांग सचैल सुगंधी अत्तरे लावून स्नान घालावयास लावले नंतर नविन कफनी परिधान करवून गळ्यात सुदंर पुष्प हार घालुन कपाळी मंगल कुमकुमतिलक करवून, माथ्यावर अक्षता अर्पण करन मंगलारतिने ओवाळुन त्यांची यथासांग संपूर्ण पूजाच करवून घेतली. श्री यशवंतराव राजे घाटगे (बड़ोदा) हे नागपुरच्या लक्ष्मणराजे भोसलें चे जावाई असून बडोद्याच्या सर सयाजीराव गायकवाडाचे भाचे असले तरी श्रीमंतीचा सारा लौकीक विसरुन ते श्री मुंगसाजी देवाचे पायी सदैव लिन असत. भगवान् श्री मुंगसाजीनी त्यांच्याच हातून श्री पुंडलिक बाबांची यथासांग पुजा करवून घेऊन सर्वांनाच पुंडलिक बाबांचे महात्म्य प्रगट करुन ते फेब्रुवारी १९४७ रोजी मुंबईस नगिन महालात(चर्चगेट) जे गेले ते पुनश्च विदर्भात परतले नाही. साधारणतः एक वर्षभर श्री पुंडलिक बाबांचे धामणगांवी वास्तव्य घडले.

 

गोरेगांवी पुनरागमनः

 

श्री खंडूनानांच्या तोंडून धामणगावी घडलेला वृतांत ऐकून सुखावलेल्या भाविकांना आता नव्यानेच श्री राजे घाटगे यांच्या हातून भगवान श्री मुंगसाजींनी करवून घेतलेल्या महापूजेची हकीगत ऐकावयास मिळून सार्या सज्जनांची मने श्री पुंडलिकबाबांना पहाण्यासाठी श्रध्देने तळमळू लागली. मग लवकरच श्रीखंडूनानांनी काही गावकन्यांसह धामणगांवी जाऊन श्री पुंडलिकबाबांना गोरेगांवी येण्यास प्रार्थिले, तेवहा मोठया प्रसन्नपणे ते पुनरपि गावी परत आले. त्यावेळी पौष पोर्णिमेस २६ जानेवारी १९४८ रोजी सौमवारी श्री गोंविंदराव काशिकर  भक्त मंडळीच्या पुडाकाराने गावातील मारूती मंदिराच्या पारावर श्री पुंडलिक बाबांसाठी स्वतंत्र नविन बगळीची स्थापना केली गेली. आता गावातील तसेच आजूबाजूचेही अनेक भाविक भक्त नित्यशः येथे येऊन श्री पुंडलिकबाबांची मनोभावे पुजा अर्चा करु लागले.

 

याच दर्म्यान ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेली घटना पूज्य श्री बाबांचे अंतर्साक्षित्व दाखवून गेली. या बाबत लक्ष्मणराव चहादाजी कुंभार (माहुली-धांडे) यांच्याकडून समजले की, श्री कोल्हे गुरुजी त्यादिवशी पूज्य श्री बाबाच्या दर्शनाकरिता गोरेगांवी गेले होते. श्री बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या दुर्लभ सहवासाचा लाभ घेत  कोल्हेगुरुजी श्री बाबांच्या आसपासच हिंडू फिरु लागले. अचानकच "बुढा मरते रे बाप्पा, गोळी झाडली रे बाप्पा" असे श्री बाबा परत परत म्हणू लागले. तेव्हा अर्थातच त्यांचे बोलणे कोणालाही समजेना. पण काही वेळाने आकाशवाणीवरुन श्री महात्मा गांधीजींच्या हत्येबाबतची बातमी ऐकून श्री बाबांच्या त्या स्वैरवाणीचा भावार्थ सगळ्यांच्याच ध्यानी आला.

 

श्री बाबांच्या जन्मोत्सवाची भव्य यात्रा:
 

लवकरच येणाऱ्या पूज्यश्रीबाबांच्या १६ व्या वाढदिवस दिनी मोठा समारंभ साजरा करण्याच्या इराद्याने गावातील श्री खंडूनानांचे बंधू श्री शंकरराव पातोंड, अभिमान सरदार, माधवराव वंजारीबुवा, अंगदराव सानप, उरकडभाऊ, तुकाराम सरदार (मास्तर), दिगंबर पांडे (पटवारी), बाळकृष्ण गावंडे (पोलीस पाटील), बाबुराव कराड (दुकानदार), तुकाराम सोनवणे, सातपूर रेल्वेगेटवरील जहागीरदार ख्वाजा अझिझउदीन, माणिकरावजी वडतकर, केशवराव सरदार, मेघोजी सरदार, गंभीरजी सरदार अशी सर्वथरातील मंडळी एकप्रीत जमून यात्रा कमीटीची स्थापना केली गेली. ठरलेल्या कार्यक्रमानुसार बुधवार दि. १४ एप्रिल १९४८ रोजी चैत्र शुध्द पंचमीला श्री बाबांच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्य गोरेगांवी त्यांची प्रथमच भव्ययात्रा संपन्न झाली. गांवो गांवचे हजारो भाविक त्या निमित्य श्री बाबांच्या चरणी पूजा समर्पण करुन वंदन करू लागले. काही विदेही संत महात्म्य पण यावेळी आवर्जून उपस्थित होते. आता ज्याच्या त्यांच्या तोंडी भगवान परमहंस श्री पुंडलिकबाबा की जय' असा एकच एक जयघोष सर्वत्र ऐकू येऊ लागला.

 

पुज्य श्रीबाबांच्या या जन्मोत्सव यात्रेनंतर येणारा प्रत्येक दिवसच गोरेगावच्या मंडळीना नित्य नवा उत्सव साजरा करण्या सारखाच दिसून येऊ लागला. कोणी 'धामणगांवीचा श्री भगवान् मुंगसाजी महाराज श्री पुंडलिकबाबांच्या अपूर्व भेटीचा वृत्तांत ऐकून तर कोणी गोरेगांवचा यात्रा वृत्तांत ' ऐकून मोठ्या जिज्ञासूपणे परमहंस श्री पुंडलिकबाबांचे रुपडे नयनी पहाण्यासाठी गर्दी करू लागला. अनेकांना अनुभवास आलेले श्री बाबांचे अत्कर्य महिमान जो तो खुल्या मनाने सर्वांस सांगु लागला. गोरेगांवचे आता पंढरपुरात रुपांतर बनून येणारा प्रत्येक जण चंद्रभागा समजून काटेपूर्णात स्नान करुन साक्षात् चालत्या बोलत्या विठ्ठलस्वरुपी श्री भगवान् पुंडलिकबाबांचे दर्शन पूजन करून स्वतःला धन्य समजूलागला.

 

वेगवेगळ्या गांवचे भाविकलोक आता पूज्य श्री बाबांचे चरण आपल्या गांवाला लागावेत म्हणून गोरेगांवकर  भक्त मंडळींना श्री खंडूनानांना विनवू लागले. भक्तांच्या इच्छेने श्री बाबांच्या मर्जिनुरुप गावो गांवी त्यांचे दर्शन सोहळे सुर झाले, श्री बावांच्या सेवेसाठी कुरणखेडचा श्री काशिनाथ शिंदे (कुपटकार) हा अगदी प्रथमपासून जवळ रहात असे. त्याशिवाय  श्री मुंगसाजींचे मुंबईस प्रयाण झाल्याने त्याच्या दरबारी रमणाऱ्या अनेकांना आता श्री पुंडलिकवाबांचीच जवळीक आवडू लागल्याने दातोडीचे सांभा महाराज, अकोल्याचे श्री देवीसिंग बैस, श्री नानामहाराज खाडे,  शैदूरजनाघाटचे मुरलीधर पाठक वगैरे मुंगसाजी भक्त श्री पुंडलिक रुपातच श्री मुंगसाजीदेवाना पाहू लागले.

                                                                                               

सेवाधारी भक्त श्री काशिनाथ :

 

श्री भगवान् पुंडलिक बाबा आपल्या सेवाधारी भक्त श्री काशिनाथच्या पाठीवर बसून जणू त्याचा घोडा करून अवघ्या गावभर नदीच्या काठाने. शेतीवाड्यातून मनमानेल तसे हिंडत असत. तोही मोठ्या निष्ठेने श्री बाबांची प्रत्येक इच्छा तंतोतंत मान्य त्यानुसारच काटेकोर वागत असे. एकदा लहरी नुसार श्री बाबाना पाठीवर बसवून भक्त काशिनाथ शेजारच्या गाझीपूरगावी दिवसभर श्रीबाबा तेथे हिंडण्याफिरण्यात व्यतीत केल्यावर रात्री परत गोरेगांवी चालण्यासाठी ते सांगु लागले. त्या वेळी काटेपूर्णा नदी पूराने ओसंडून वाहत असून रात्रीचा दाट काळोख पासरला होता. त्यामुळे त्या गावातील श्रीबाबांच्या मुसलमान भक्त श्री मुसा पाटील इतर गांवकरी त्यांना अडवून दुसर्या दिवशी परत जाण्याची विनंती करु लागले. पण श्री बाबा ऐकता म्हणू लागले, "काळजी करु नका ना बुवा, जाऊ द्या आमाले" अखेरीस नाईलाजास्तव गांवकरी गप्प बसले इकडे भक्त काशिनाय कोणतीही शंकाभिती मनी धरता 'गोंविदरमण श्री पुंडलिक बाबाकी जय' म्हणत नदीच्या दिशेने श्रीबाबांना पाठीवर घेऊन निश्चितपणे चालू लागला. बाबांच्या आज्ञेने डोळे मिटून त्याने नदीच्या पाण्यात पाऊल टाकले आश्चर्य म्हणजे त्या नदीप्रवाहातून त्यास रस्त्याप्रमाणेच कोरडा मार्ग मिळून तो गोरेगाची सुखरुप येऊन पोहोचला. एवड्या पुरातून श्री बाबांसह भक्त काधिनाथ कोरडे गावी परतलेले पहाताच माता मंजुळाआई त्यांस परत परत त्याविषयी खोदून विचारु लागताच जे घडले तेच भक्त काशिनाथाने सविस्तर सांगितले .ते ऐकून सर्वच अगदी थक्क होऊन गेले.

 

एकदा असेच काशिनाधभक्ताचा घोडा करुन श्री बाबा रेल्वे रुळावरुनच कुरणखेडला जाऊ लागले. बरेच अंतर मजेत चालत गेल्यावर समोरुन एक मेल भरधाव वेगाने येताना दिसली.पण आझानसल्याने तो श्री बाबांना घेऊन तसाच रेल्वेलाईवरुन बिनदिक्क्त चालत राहीला. अचानक रेल्वे जवळ पोहयताच श्री बाबांनी त्याच्या पायात पाय घालून त्यास बाजूला पाडले. त्या वेळी त्याची शुध्दच हरपून गेली होती. थोड्यावेळाने शुध्दीवर आल्यावर पहातो तो श्री बाबांसह अगदी सुखरुप बसल्याचे त्याला उमजून आले.

 

श्री बाबांच्याबरोबर त्यांच्या सेवेसाठी तो काटा (वाशिम) इतरत्रही गावोगावी महिनोमहिने एकनिष्ठेने रहात असे. त्याचे संसारात मुळीच लक्ष नसे. गोंविदरमण श्री पुंडलिकवाबाचा नित्य नामघोष करीत वेळेला मिळेल ते प्रसाद म्हणून खाऊन तो पूर्णभक्तित रम माण झालेला दिसून येई. पुढे ' कोणाची बायको, कोणाचे गणगोत, कोणाचे भाऊबंद' असे सदैव बडबडत रहाणाऱ्या काशिनाथाला लोकांनी वेडा समजून त्याच्या हातापायात बेड्या ठोकल्या परंतु वस्तुतः श्री बाबांच्या भरक्तीसेवेने त्थाचीही स्थिती पूर्ण विदेही बनून लोकांच्या दृष्टीने वेड्यामध्ये गणली गेली. पण अनेकांना त्याची ग्यानी अवश्या समजून त्यांचे बद्दल परम आदर वाटत असे. अखेरीस कुरणखेड येथेच तो समाधिस्त झाला.

संतत्वाची तऱ्हेवाईक परीक्षा

 

परमपूज्य श्री बाबांच्या सहवासातील सामान्यजनांच्या बुध्दीपलीकडील अनेक सत्यघटना अनुभवणारा प्रत्येक माझी भक्तगणजगकाय म्हणेल ? यांची बिल्कुल तमा बाळगता श्री बाबांची खरीखुरी थोरवी समजून सगळ्यांनीच त्यांच्या दुर्लभ साधुत्वाचा लाभ आपापल्या कल्याणासाठी रुन घ्यावा याच उद्देशाने आपले स्वानुभव निवळतेने एकमेकांच्या कानी घालत असे. संत गाडगेबाबांचे अनुयायी श्री राधाकिसनबुवा कुटासा येथील श्रीबाबाच्या अपूर्व दर्शनभेटीनंतर गावोगांवीच्या आपल्या भजनकिर्तनातून श्री बाबांचे महात्म्य सांगितल्या शिवाय राहूच शकत नव्हते. गोरेगांवचे सद्भक्त श्री अभिमानदास सरदार यांनीही आपल्या उस्फूर्त काव्यातून श्रीबाबांच्या लीला शब्दांकित करुन, भक्त भाविकांच्या साथीने तन्मयतेने चालीत म्हणुन अनेकांच्या हृदयापर्यंत श्रीबाबांचे संतत्व' नेवून पोचविण्यास मदत केली.

 

नेहमीप्रमाणेच किर्तनातून श्री बाबांचे महात्म्य वर्णन करीत श्री राधाकिसनबुवा एकदा खरब (खरवडी) येथे पोचले. त्यांचे कडुन श्री पुंडलिकदेवाची माहिती समजल्यावर गावकन्यांनी श्री बाबांना समक्षच गांवी आणण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांना घेऊन येण्यासाठी राधाकिसनबुवा श्री शांताराम पाटलाची बंडी (बैलगाडी) जुपुन शांताराम पाटलाची पत्नी सौ. हिरुबाई तिची मुलगी नभू, हिरपूरचे रहिवासी श्री पूर्णाजी पंघेकर वर्गैरेसह गोरेगांवी निघाले. वाटेत सौ. हिरुबाईची चुलती सौ. पार्वताबाई सोनटक्के गाडीच्या आडवे येत कोठे निघाले' म्हणुन विचारताच, श्री बाबांची माहीती सांगून त्यांना आणण्यासाठी जात असल्याचे राधाकिसनबुवांनी सांगितले. तेव्हा मोठ्या ठसक्याने गंमत उडवीत त्या राधाकिसनबुवांना म्हणाल्या " श्री बाबा जर गोपालकृष्ण असतील तर माझा नवरा एका रात्रीत मेला पाहिजे तो मेला तर मी बाबांना मानीन' त्यांच्या या विचित्र बोलण्याने सर्वानाच वाईट वाटले. पण संतत्वाची अशी तर्हेवाईक परिक्षा करण्याच्या त्यांच्या बुध्दीमत्तेपुढे कोण काय करणार ? त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता श्रीबाबांना घेऊन राधाकिसनबुवा इतर मंडळी खरबला पोहोचली. गावात येताच ध्यानीमनी नसताना श्रीबाबा राधकिसनबुवांना म्हणु लागले," ती बाई काय म्हणे हो ? तो बुढा मरते बुवा. एका रात्रीत मरते. " हे ऐकुन कळवळुन राधाकिसनबुवा बाबांना समजावून सांगत, असे बोलण्याबद्दल प्रार्थु लागले. तेव्हा निश्चयी स्वरात बाबा म्हणुन गेले, "वाक्य चुकत नाही बुवा." खरोखरीच आश्चर्य म्हणजे त्याच रात्री काही एक कारण वा आजार नसलेला त्या बाईचा हट्टाकट्टा नवरा अचानक मरण पावला. तेव्हा. गं.भा. पार्वताबाई श्री बाबांना साक्षात गोपालकृष्ण मानून चरणी दंडवत घालू लागल्या. श्री बाबा मग जेवताच तेथून परत गोरेगांवी निघुन आले.

 

मुर्तिजापुरी श्री स्वामी समर्थ मंदिरी दत्तजयंती उत्सव:

 

        मुर्तिजापुरला त्यावेळी श्रीमान विठ्ठलराव जमादार नावाचे श्री क्षेत्र अक्कलकोटनिवासी *श्रीस्वामी समर्थ* महाराजांचे परम भक्त रहात होते. ते गावातील मोठे जमीनदार धनकनक संपन्न व्यक्ती म्हणुन मशहूर असूनही त्यांची पूज्य श्री स्वामी समर्थावरील भक्तीही सर्वत्र परिचित होती . श्री कृपेने त्याना लाभलेले सुपुत्र श्री कृष्णकुमार जमादार अगदी अलिकडेच येथील नगराध्यक्षपदीही विराजित झाले होते. त्या विठ्ठलराव जमादारानी आपल्याला आलेल्या अनुभवामुळे मुर्तिजापुरला श्री स्वामी समर्थाचे भव्य मंदिर उभे केले. श्री स्वामी समर्थ हे साक्षात *दत्ताचेच* अवतार म्हणुन गणले जात असल्याने या मंदिरात *श्री दत्तजयंती सोहळा* मोठ्या थाटाने श्री जामदार अयोजित करत असत.

       सन १९४९ मध्ये डिसेंबर रोजी येणाऱ्या श्रीदत्तजयंती उत्सवाकरिता श्री विठ्ठलराव जमादारांनी पूज्य श्री पुंडलिक बाबांना आपल्या मंदिरात आणण्याचे ठरविले. त्यानुसार गोरेगांवी जाऊन तेथील भक्तगणांना सागुन दि. 3 डिसेंबर रोजी ते आपल्या दमणीतून श्री बाबांना मुर्तिजापूरी घेऊन आले याचवेळी श्री विठ्ठलरावांचे घरी श्री संत बद्रीबाबा नावांचे दुसरेही एक परमाधिकारसंपन्न साक्षात्कारी सिद्ध सत्पुरुष निवास करीत होते. उत्सवात त्यांची श्रीबाबाची हृदयंगम भेट घडून आली. दोन्ही संताच्या पावन उपस्थितीत *श्रीदत्तजयंती* सोहळा श्री स्वामी समर्थाच्या मंदिरी अलोट उत्साहात संपन्न झाला.