रामकृष्ण तो ही मीच:
मौन विदेहावस्थेतील श्री बाबांचे मुखातून कधीकधी अनाकलनीय उद्गार निघूप समोरचा भक्त थाक्क हऊन जाई. पुढे शांत विचाराने त्याबाबत चिंतन केल्यावर त्यातील भावार्थ उमजत असे. एकदा कौंडण्यपूर येथे गेले असताना तेथील एका जागी थांबून ते सहजच म्हणून गेले, "आम्ही कृष्णावतारात येथे येऊन गेलो होतोना, बुवा."
श्री बाबा धांडेना एके प्रसंगी ते म्हणाले होते, "आम्हीच रामकृष्ण होतो ना बुवा." अनेकांना त्याबाबत तशी दर्शनेही घडली सुप्रसिद्ध डॉ. बी. टी. सिध्दम यांना राम रुपात तर नागपूरच्या श्री. ना. सी. गुल्हानेच्या पत्नी सौ. लीलाबाईना कृष्ण रूपात श्री बाबांचे दर्शन लाभले होते.
Table Of Contents
- 1.रामकृष्ण तो ही मीच:
- 2.आध्यात्म गुरुकुलास श्री बाबांचे आशिर्वाद:
- 3.गीताबाईकडून श्री दुगदिवी मंदिर बांधविले
- 4.सद्भक्त बाबाधांडे द्वारा प्रबोधन कार्य
- 5.संत तेजस्वी बाबांच्या रूपात श्री बाबा -
- 6.लोहीगांवी श्री मुंगसाजी देवांची मूर्तीस्थापना
- 7.धर्मगुरुचेंही विनम्र प्रेम -
- 8.कोकणातल्या मंगलताईना मूर्तिजापुरी बोलावले -
- 9.साईरूपात दर्शन दिले -
- 10.जैसी भक्ती तैसी प्रचिती
- 11.भाग्यदाते श्री बाबा-
- 1३.भाविकांच्या सद्भावनेने घडलेली कार्ये
आध्यात्म गुरुकुलास श्री बाबांचे आशिर्वाद:
राष्ट्रसंत अनुयायी आदरणीय ग्रामगीताचार्य श्री तुकारामदादा यांना मौन साधनेपूर्वी स्वतः राष्ट्रसंतानीत योगीराज श्री संत लहानुजी बाबांबरोबर श्री पुंडलिक बाबांचेही दर्शन घेण्यासाठी सांगितले होते. त्या प्रमाणेच त्यांनी श्री बाबांचे दर्शन घेऊन मगच आत्मनुसंधान टेकडी (अड्याळ, जि. चंद्रपूर) येथे मौनसाधना सुरु केली. श्री दादाच्या ग्रामगीता ज्ञानयज्ञ प्रसंगीही श्री बाबांनी उपस्थित राहून भाविकांना दर्शनाचे सुख दिले होते. पूज्य राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी कालाप्रसंगी मोझरीच्या आध्यात्म गुरुकुल बांधकाम या कामाकरिता श्री दादांनी सक्रीय सहकार्याच आवाहन करताच श्री बाबांनी सर्वप्रथम सहयोगाचा संकेत दिला त्यानंतरच अनेकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन हे गुरुकूल निर्माण झाले.
गीताबाईकडून श्री दुर्गादेवी मंदिर बांधविले
या पुर्वीच उल्लेख केलेले सद्भक्त श्री किसनराव गुल्हाने गोरेगांवी श्री बाबांच्या सेवेत तन्मय झाले होते. त्या दरम्यान त्यांच्या पत्नी सौ. गीताबाई अमरावती जवळील माधानला मिडवाईफ ट्रेनिंगला गेल्या. ट्रेनिंग पूर्ण होताच त्यांना नोकरी मिळाली. त्या वेळी त्या गोरेगांवी श्री किसनरावांना आपल्याकडे नेण्यासाठी आल्या. परंतु श्री बाबांचे पायी चित्त जडल्याने त्यांनी गोरेगांव सोडण्यास नकार दिला. परत काही दिवसांनी सौ. गिताबाई फिरुन गोरेगावी येऊन त्यांना विनवू लागल्या पण त्यांचा निश्चय पूर्ववत ठामच दिसला. तेव्हा मनी श्रद्धा नसूनही सौ. गीताबाई बाबाकडे येऊन दर्शन घेऊन बसल्या व प्रथम भेटीच्या वेळी श्री बाबांनी काढलेले उदगार, " देव भावाचा, नाही कोणाच्या बापाचा हो” याचे स्मरण करीत श्री बाबा खरोखर कोण असावेत या बाबत मनी शंकीत झाल्या. त्याचवेळी त्यांना विविध संत व श्री बाबांचे कृष्णरूप दर्शन घडून त्या विनम्रतेने डोळयात प्रेमाश्रू साठवून त्यांचे चरणी श्रद्धेने वंदन करु लागल्या, मग श्री बाबांची परवानगी घेऊन पतीला दुराग्रह न करता त्या डोंगर कठोन्याला नोकरीत रूजू झाल्या. मिळणार्या पैशातून १/१० रक्कम त्या श्री बाबांचे नांवे भक्तिने बाजूस काढून ठेवू लागल्या. त्यातुन सन १९७० मध्ये तेथे सुतिकागृह बांधण्याच्या उद्देशाने त्यांनी प्लॉट खरेदी केला. श्री बाबांना परवानगी मागताच ‘मंदिर बांधा ना, मां बाई’ असे त्यांचे उत्तर मिळाले. त्यामुळे तो बेत रहीत करून काही दिवसांनी स्वत:चे घर बांधण्यासाठी त्यांनी श्री बाबांना विचारताच पहिलेच उत्तर मिळाले तरीही त्यांनी घराचे बांधकाम सुरु केले. पण त्यात अडचणी उद्भवून तेही स्थगित करावे लागले. त्यानंतर पुनःश्च श्रीबाबां समोर येताच त्यांनी ‘मंदिर बांधाना बुवा' हेच पालुपद सुरु ठेवले. त्यावेळी सौ. गीताबाईच्या मनांत श्री बाबा दर्शनार्थीना नेहमी, 'देवीच्या दर्शनाला जाऊन यांना, भाऊ’ असे म्हणत असल्याचे ध्यानी येवून श्री देवीचे मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली. पण आपल्या तुटपुंज्या पैशातुन हे कसे घडेल या विवंचनेत असतानाही केवळ श्री बाबांच्या अमोघ आशिर्वादानेच मुर्तिजापूरच्या पुंडलिकनगरात श्री बाबांच्या दरबारासमोरच श्री देवीचे मंदिर उत्कृष्ट कळसासह बांधून पूर्ण झाले. मग यथावकाश त्यामध्ये श्री अष्टभुजा दुर्गा देवीची सिंहारुढ भव्य संगमवरी मूर्ती बसवून सन १९७५ एप्रिल मधील शुभमुहूर्तावर श्री देवीची यथासांग प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यानंतर भक्तांकरिता प्याराराम धर्मशाळाही त्यांनी बांधली, श्री बाबांच्या प्रत्येक सेवाकार्यात निरपेक्ष बुद्धीने सहभागी होऊन त्यांनी अनेकदा सक्रीय सहकार्य केले आहे. श्री बाबांचे चरित्र प्रकाशन असो वा फोटो प्रकाशन असो त्यांची भरघोस मदत ठरलेलीच. श्री खंडूनानांचाही त्यांना उत्कृष्ट सेवा सहवास घडून पूर्ण आशिर्वाद लाभला. श्री पुंडलिक नगरच्या प्रवेशद्वारीच बांधलेल्या आपल्या कुटीरामध्ये त्या आपल्या पतीची मनोभावे सेवा करीत श्री बाबांच्या भक्तीप्रेमात जीवन व्यतीत करीत आहेत. श्री. किसनरावही फक्त केवळ एक श्री बाबांचाच ध्यानी मनी ध्यास धरून पूर्णतः पुंडलिकमय होऊन गेले आहेत.
सद्भक्त बाबाधांडे द्वारा प्रबोधन कार्य
सन १९५८ मध्ये गोरेगांवी प्रथम दर्शनास आलेल्या श्री बाबा धांडेच्या मस्तकी आपला चरणस्पर्श देऊन, त्यांनी आणलेल्या शिदोरीतील भोजन प्रेमाने मागूनघेऊन त्यांस उच्छिष्ट प्रसाद देऊन श्री बाबांनी त्यांना पहिल्या भेटी पासूनच आपल्याशी दृढ बांधून ठेवले. पुढे 'तुझा माझा अनेक जन्मांचा संबंध असल्याचेही' त्यांनी स्पष्ट केले होते. अगदी यानुसारच त्यांच्या श्री बाबांच्या वरील श्रद्धा प्रेमाने घडलेल्या प्रत्येक दर्शनप्रसंगी त्यांना उद्बोधक मार्गदर्शन घडत गेले. अमरावतीहून गोरेगांवी येतांना ते एकदा गाडी सुटण्याच्या गडबडीत हारप्रसादाच्या नादात भांबावले असताना त्यांना श्री बाबांचा गाडी मिळण्याबाबात स्पष्ट संदेश ऐकु आला. त्यामुळे गाडी मिळुन ते गोरेगांवी पोचताच दर्शन करुन हार प्रसाद समर्पण करतांना श्री बाबा त्यांना म्हणाले, "भाव पाहिजे ना बुवा. तू आवज ऐकला काय?" तसेच गावी एकदा पेटीतील जुनी कागदपत्रे आवरुन ठेवतांना सहज हाती लागलेला बचनकाचा विषारी खडा अजाणतेपणे त्यांनी तोंडात टाकला. ते पाहन त्यांच्या मोतोश्रीनी त्यांना त्याबाबत सांगून लगेच धुंकावयास लावला. त्यामुळे एका भयंकर संकटातून ते सहजच बचावले. नंतर गोरेगांवी दर्शनाला आले तर श्री बाबा म्हणू लागले, " विष खातं काय रे ?"
या सारख्या अनेकानेक घटनांनी श्री बाबा कोठेही असले तरी अद्रुश्य रूपाने ते सदासर्वदा आपल्या बरोबर असल्याचे श्री धांडेच्या ध्यानी येवू लागले. वेळोवेळी श्री बाबांच्या मुखातून निघणारी छोटी - छोटी वाक्ये वा शब्दही त्यांना अप्रतिम वेदवेदांगाचा उत्तम बोध देऊ लागली. त्यातूनच श्रीकृपेने त्यांचे हातुन गद्य-पद्य लिखाण घडुन वा वकृत्वा्द्वारेन इतरानाही प्रबोधन होऊ लागले. त्यांच्या द्वारा लिहून घेतला गेलेला उपासनापाडठ श्री बाबानी परत वाचून घेऊन भक्तांना सामुदायीक प्रार्थना समयी म्हणण्याची स्फूर्ति देऊन गेला. संस्थांद्वारे परमहंम मासिक प्रकाशित करून त्यातील उत्तम लेखन संकलना बरोबरच प्रथमचे संपादकीय लेख तर केवळ श्री बाबांचे अंतरीचे गुजच श्री बाबा धांडेच्या द्वारा भक्तांना पोहचवुन प्रबोधनाचे फार मोलाचे कार्य करु लागले होते, श्री पुंडलिक स्तवराज, गीत पुंडलिक वचनामृत इ. अनेक कृतीतून त्यांच्यावरील श्री बाबांची कृपा लोकांसमोर प्रगट झाली. आपल्या महासमाधीपुर्वी श्री बाबांनी त्यांची मूर्तिजापूरी बदली करणून मनसोक्त सहवास प्रदान केला. आपल्या समाधी तिथीसमयीच त्या सोबत एक फोटो आधीच काडवून अपूर्व आठवण त्यांचे संग्रह ठेवून दिली. महासमाधीवेळी त्यांची पातूरला बदली करवुन 'संताला निरोप आहे रे' असे सूचक उदगार श्री बाबानी काढले होते. श्री बाबांच्या समाधीनंतर त्यांच्या आशिर्वादबळाने त्यांनी “श्री भगवान परमहंस पुंडलिक महाराज जीवन दर्शन” हा मोठा ओवीबद्ध ग्रंथ लिहुन पूर्ण केला. भक्तांच्या सहकार्याने तो प्रकाशित झाला आहे. लवकरच ते भक्तांच्या अनुभवांचे संकलन करून एक गद्य ग्रंथही लिहीत आहेत. श्री खंडुनानांचेही विष्यनुभवव लीला त्यांनी अनुभवल्या व परमहंस विशेषांकडून स्पष्ट केल्या आहेत.
संत तेजस्वी बाबांच्या रूपात श्री बाबा -
रोहणा ता. मूर्तिजापूर मधील सुप्रसिद्ध कार्यकर्ते श्री विश्वनाथराव मुळे हे प्रथमपासूनच भाग्यवान गृहस्थ, त्यांना अनेक थोरसंताची दर्शने लाभून आशिर्वाद प्राप्त झाला आहे. विशेषत श्री गंगाधरबाबा (माना) व श्री पुंडलिक बाबांचा त्यांना बराच सत्संग लाभला. अनेक अनुभव ही चाखता आले. एकदा घरगुती कोर्टकचेरी संबधाने ते चिंतित असतांना श्री बाबांचा स्वप्नात "निकालाच्यावेळी मी तिथे चौकीवर असेन" असा दृष्टांत झाला ते अकोल्याचे कोर्टात ठराविक वेळी हजर असतांना त्यांना तिथे संत तेजस्वीबाबा (मालेगांव) या महान अवलियाचे अचानक दर्शन घडले व कार्यात यश आले. त्यातुनच त्यांना दोन संतामधील एकरुपता कळून आली. त्यांच्या दिपक नावाच्या अत्यंत हुशार मुलाच्या परदेशीप्रयाणापूर्वी श्री बाबांनी 'साता समुद्रापलिकडे जातो रे' असे आधीच सांगून आशिर्वाद दिले होते. त्यांचे श्री बाबांच्या सहवासातील प्रत्येक क्षण अवर्णनीय अनुभूतीचे असल्याचे ते सांगतात. श्री बाबांच्या महासमाधीच्या दिवशी पूर्ण दिवसभर त्यांना श्री बाबांची अलभ्य संगती लाभली. त्यावेळी 'गांधी महात्मांचे पत्र आल नां रे’ हे बाबांचे सूचकबोल त्यांनी स्पष्ट ऐकले होते. आजही आपला बराचवेळ श्री पुंडलिक नगरमध्ये घालवून एका आगळ्या वेगळ्या धनाची वृद्धी करण्यात श्री मुळे गढून गेले आहेत.
लोहीगांवी श्री मुंगसाजी देवांची मूर्तीस्थापना
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील लोहीगावी श्री बाबाचे एक परमभक्त श्री पंढरीदास महाराज खर्डेकर राहतात. त्यांनी श्री सद्गुरू कृपेनेच श्री भगवान मुंगसाजी महाराजांचे मोठे सुंदर ओवीबध्द चरित्र लिहून प्रकाशीत केले आहे. त्यामध्ये त्यांनी श्री बाबा व श्री मुंगसाजी देवाच्या भेटीचा तसेच श्री बाबांच्या एकंदर चरित्राचा अल्पसारांश मोठया वेधकतेने प्रासादिक शब्दात एका अध्यायामध्ये गुंफला आहे. त्यांची श्री बाबांवर श्री मुंगसाजी देवाचेच स्वरूप या श्रध्देने गाढभक्ती आहे. आपल्या लोहीगावी त्यांनी श्री बाबाना नेवून यथासांग पूजिले व त्यांच्याच पावन उपस्थितीत श्री मुंगसाजी देवाची पवित्र मूर्तिस्थापन केली. त्या मंदीरात आज अनेक भाविक उपासना पूजा करून अपार सुरत मिळवित आहेत.
धर्मगुरुचेंही विनम्र प्रेम -
पुज्य श्री बाबांचे महात्म्य जाणुन प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे मन आदराने विनम्र होते. भंडारा येथील हलबा समाजाचे धर्मगुरु श्री जागेश्वर महाराज यांचे ही श्रीबाबांचे ठायी प्रेम दिसुन येते . श्रीबाबांविश्यी रचलेल्या ‘स्फुर्तिरंग’ काव्यातुन ते
स्पष्टपणेच द्दग्गोचर होते. नमून्यादाखल त्यातील या काही ओळी पहा-
बघता स्वानंदी श्री गुरुमूर्ति ही, शांती लाभते मनी ।
अष्टसात्विक
भाव उमलूनिया, शीर लोळे चरणी ।
गमे उजळिले सुकृत पूर्वीचे, काय ? आजि लामीले
गवसले गमावले ते श्री पुंडलीकबाबा सदगुरु भेटले ॥ १॥
गुरू ब्रम्ह, गुरू विष्णु, गुरु शिव महामंत्र हा असे
गुरू साक्षात परम्ब्रम्ह स्वरूप, पुंडलीकबाबा
दिसे ।
काया वाचा मन त्रिदल, सद्भावे सदगूरूसी अर्पिले ।
चिदानंदी चिन्मय श्री पुंडलिकबाबा सद्गुरू भेटले ॥ २॥
कोकणातल्या मंगलजाईना मूर्तिजापुरी बोलावले -
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात करजगाव नावाचे छोटेसे गाव आहे. येथे राहणार्या मंगलताई हेदूकर ना बालपणापासून धार्मिक वेड होते, गायत्री उपासना करीत त्या सद्गुरू भेटीसाठी तळमळत होत्या. त्या द्रुष्टीने वाचन शोधाशोध करतांना मुम्बई वरून प्रसिध्द होणाऱ्या भक्तिसंगम मासिकाची त्यांना मोलाची मदत झाली. एकदा त्या अशाच हताश होऊन गुरुभेटीसाठी तळमळत असतांना झोपेत त्याना शिक्षकाच्या रूपात श्रीबाबाचे दर्शन घडून 'मांजरपाटाची चादर घेउन ये' असा द्रुष्टांत झाला. दुसऱ्या दिवसी भक्तिसंगम मासिक उघडून पाहील्यावर त्याना त्यातील त्या शिक्षकरूपी श्री बाबांची सर्व हकीकत कळली. यथवकाश त्या विदर्भात प्रथमच मूर्तिजापूरी आल्या. श्री खंडूनानांनी पहिल्याच भेटीत त्यांना कोकणातून आल्याबाबतची सूचक बोलणी करून श्री बाबांच्या दर्शनी पाठविले श्री बाबांच्या दर्शनाने त्यांची आकांक्षा पूर्ण झाली त्यांना विविध अनूभव आले. पुढे त्यांनी श्री बाबांच्या पादुका आपल्या गावी स्थापल्या. एके वेळी श्री बाबा समक्षही त्यांचे घरी कोकणात जाऊन त्यांच्या श्रध्दा भक्तीपुर्ण पूजेचा स्विकार करून आले होते.
साईरूपात दर्शन दिले -
मुंबई जवळील अंबरनाथ येथे राहणाऱ्या शशीकला रेवनकर या प्रथमपासूनच शिर्डीच्या श्री साईबाबाची मनाभावे पूजाअर्चा करून भक्तीसूखात रंगूनगेल्या होत्या त्यांना सर्वच संताबद्दल आदर असल्याने पुण्याहून प्रसीध्द झालेल्या पिसारा मासीकाचा श्री पुंडलीक महाराज विशेषांक त्या श्रध्देने वाचू लागल्या. त्याच वेळी गादीवर बसलेल्या श्री पुंडलीक बाबांच्या चित्राच्या ठिकाणी त्याना श्री साईबाबांचे दर्शन घडू लागले. त्या मुळे त्या समक्ष मूर्तीजापूराला आल्या. त्या वेळी गादीवर बसलेल्या श्री बाबांच्या ठीकाणी त्याना श्री साईबाबांचे पूनरपि दर्शन घडले. तेव्हा पासून श्री बाबा व श्री साईबाबा एकच समजून त्या पूजा करू लागल्या. अंबरनाथला श्री बाबांना आपल्या घरी आणवून त्यांनी पूजा सोहळाही केला होता.
भक्तरक्षणी धावं येई-
कुरणखेडच्या पार्वताबाई धामोरे या गरीब कुटुम्बातील साध्या भोळ्या महिला, श्रीबाबांची
मनापासून भक्ती करतात. एकदा त्यांचा मुलगा नामदेव विचित्र द्यवयोगाने खुनाच्या हल्ल्यात सापडला. त्या वेळी अचानकपणे श्री बाबांनी धावून जाऊन त्याला सोड्वुन त्याचे रक्षण केले.
अमरावतीचे श्री सुधाकर मोकासे आपल्या पत्नीसह एकदा दर्शनास आले असताना, श्री बाबा त्यांच्या पत्नीकडे पाहता म्हणाले, "तू मरतन बाई" त्या वेळी शुध्दभक्तीने ठाम श्रध्देने त्या बोलल्या "आपण असताना कशी मरेल बाबा ?"
पुढे योगायोगाने त्या घरी असताना पूजेनंतर खाली ठेवलेल्या निरंजनीतील ज्योतीने त्यांची साडी पेटली. त्यांची तन्मयतेने चाललेली प्रार्थना सुरू असताना निम्मी साड़ी जळूनही त्यांना त्याची जराही खबर नव्हती जवळच स्वयंपाक करनाऱ्या त्यांच्या मूलीने पाहाताच प्रसंगावधान राखून जाळ विझवला . अशाप्रकारे आधी सुचीत करून प्रसंगी श्री बाबांनी त्यांचे असे रक्षण केले.
जैसी भक्ती तैसी प्रचिती
एकदा परमपूज्य श्री बाबांना घेवून श्री नारायणभाऊ व काही भक्तगण नागपुरला निघाले होते. प्रवास रेल्वेने सुरू होता श्री बाबांचे रूप पाहून त्यांच्या विषयी माहीती जाणून घेवून प्रवासातील प्रत्येक स्टेशनवरील नवनवीन श्रध्दाळू प्रवासी त्याचे दर्शन घेत होते. श्री बाबांच्या रेल्वे डब्यातील अगदी प्रथमपासूनचे एक मध्यमवयीन जोडपे हे सर्व दृश्य तटस्थपणे पाहत होते अचानक 'अजनी' स्टेशनवर गाडी येताच श्री बाबानी अंगावरील कफनी काढून दुर फेकली. त्याचे ते निर्मळनीरागस वितरागी दिगंबरावस्थेतील रूप पाहून इतकावेळ तटस्थपणे श्री बाबांकडे पाहनाऱ्या त्या जोडप्याच्या मनोमनी श्रध्दा भक्तीचा वेगळाच संचार घडला . त्यांनी त्वरेतेने जवळ येवुन श्री बाबांच्याचरनी विनम्रतेने वंदन केले. हे पाहून जवळच बसलेल्या श्री नारायण भाऊंना आश्चर्य वाटले त्यांनी या बाबात वीचारताच ते जोडपे म्हणाले, "आम्ही दिगंबरपंथीय जैन कुटूंबीय श्री बाबांनी आमच्या उपास्य दैवताच्या श्री महावीर रूपात आम्हाला दर्शन देऊन त्याची खरी ओळख पटवून दिली. त्या मूळेच आम्ही नि:शंकमनाने त्यांचे चरनी वंदन केले".या वरील कुटुंबा प्रमाणेच अनेकानेक धर्मपंथातील भावीकांना श्रीबाबांची विविध रूपात दर्शन प्रचिती आल्याने ते निष्ठेने त्यांची भक्ती करताना दिसतात. यवतमाळ नेर जवळील वटफळीचे केसरीमलजी बंधु प्रेमचंदजी ओसवाल जैन परिवार भक्तीने बाबांना मानतो.त्यानी सेवाभावाने श्री बाबांच्या दरबारी तांब्याचा मोठाकोपर अर्पण केला आहे.
सध्या मुर्तिजापूरमध्ये राहणारे श्री गाडगे महाराज विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री नानासाहेब काळे (गुरुजी) श्री बाबांची माहिती ऐकून एकदा गोरेगावी दर्शनासाठी निघाले. घरातून सकाळीच काहीही न खाता श्री बाबांसाठी शिदोरी (जेवण) घेऊन ते पाच मैल दरबारी पोहोचले. त्यांना बघताच श्री बाबा 'विदूराच्या कण्या आल्या’ असे म्हणत भोजन मागू लागले. श्रीबाबांनी आपली तळमळ ओळखुन भोजन केल्याचे पाहून त्या नंतर तृप्त मनाने गुरुजींनी प्रसाद घेतला व नंतर प्रसंगानुरुप ते श्री बाबांच्या दर्शनास येऊ लागले.
अकोल्यातील श्री दामोदरराव पांडे व सौ. सुनिताताई यांच्या घरातील सर्वांचीच श्री बाबांवर फारच निष्ठा आहे. यांच्याकडे आल्यावर देवघरातील श्री रेणूकामातेच्या समोरच श्री बाबांचे जेवणखावण, बसणे-निजणे घड़त असे. यांना श्री बाबाचे अनेकानेक अनुभव आले. असून आपले सर्व जीवनच श्री बाबांच्या कृपेने चालत असल्याचे त्यांना पदोपदी जाणवत असते.
विव्हा मांडवा येथील सौ. वेणूताई रोडगे यांची श्री बाबांचे चरणावरील अवर्णनीय प्रीती वर्णन करणे खरोखरच कठीण आहे. त्यांच्या समक्ष भेटीतून या बाबत ऐकणे जरूरी आहे. सध्या त्या आपल्यागावी श्री बाबाची संगमवरी मुर्ती स्थापन करीत असल्याचे कळते.
नांदुर येथील श्री पी. डी. देशमुख्य यांची शेगांवच्या श्री गजानन बाबांवर श्रद्धाभक्ती असल्याने त्यांच्या पत्नीने आपलेला श्री पुंडलिक बाबांचे फोटो त्यांनी पूजेत नठेवता थोड्या आढ्यतेने पेटीमध्ये ठेवून दिला होता. पुढे कालांतराने बाबाकडे येणे झाले. ते दर्शन घेऊ लागताच श्री बाबा म्हणाले, "आम्हाले पेटीत लपविले काय बुवा",
हे ऐकताच श्री देशमुखांना श्री गजानन बाबा व श्री बाबा समानच असल्याचे समजले. त्यांनी पत्नीच्या श्रद्धेचा आदर करुन पेटीतील श्रीबाबांचा फोटो बाहेर काडुन देवघरात स्थापन करुन पूजाअर्चा सुरु केली.
पुंडलिक नगरजवळील सौ. सुशिलाबाई भाऊरावजी देशमुख यांच्या शुद्ध भावभक्तीने श्री बाबांचे त्यांचे घरी हमेशा जाणे येणे घडे. केव्हाही त्यांच्या आगमना प्रसंगी त्यांच्या मर्जिनुसार दोनचार भोजनाचे घास घालण्यासाठी त्या सदेव तत्पर असत. मध्यरात्री असो वा भल्या पहाटे असो, त्याबाबतीत
त्यांना कधीच कंटाळा वाटत नसे.
भाग्यदाते श्री बाबा-
श्री अजाबदास सरदार हे श्री बाबांच्या जन्मगांव गोरेगांवचे मुळ रहिवासी. त्यामुळे पूर्व पुण्याईने त्यांना लहान पणापासूनच श्री बाबांचा सहवास लाभू लागला. प्रथम बालवयामुळे मूठभर प्रसादाच्या अपेक्षेने श्री बाबांच्या दरबारी आरती, भजन,
पूजन प्रसंगी मित्र-सवंगड्यासह
घुटमळणारे अजाबदास श्री बाबांच्या कृपेने त्यांचे महात्म्य समजून श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन ते श्री बाबांना आपल्याकडे कृपाद्रुष्टी वळविण्यासाठी विनवू लागले. तेव्हा श्री बाबा म्हणाले
"हे काही शिल्लक नाही. भाग्य पाहिजे ना रे भाऊ" ते ऐकून नम्रतेने त्यांनी श्री बाबांना आपणच भाग्यदाते असल्याचे सांगून कृपा करण्याची विनंती केली. तेव्हा देवीचे दर्शन करुन येण्याची आज्ञा करून त्यानूसार केल्यावर ‘काम झाले ना भाऊ' असे सांगून त्यांनी आशिर्वाद दिला. यानंतरच अगदी प्रथम होऊन गेलेल्या भक्तकवी अभिमानदासांचीच परंपरा चालवून तसेच भक्तीकाव्य करण्याची त्यांना प्रेरणा लाभली. मोठ्या तन्मयतेने स्वरचित पदे गावून श्री बाबांची एक वेगळी सेवा करणाऱ्या ह्या भक्तांमुळे अनेकांना श्री बाबांचे महात्म्य समजले. आजही समर्पणवृत्तीने ते पुंडलिकनगरात श्री बाबांच्या संस्थानाचे प्रत्येक कामात जातीने सहभागी होऊन सेवाकार्य करीत आहेत. नुकतीच त्यांच्या श्री बाबांवरील भक्तीगीतांची ध्वनीफित (कॅसेट) प्रकाशित झाली आहे. मध्यंतरी बंद पडलेले परमहंस त्रैमासिक पुनःश्च प्रकाशित करण्याच्या कामी त्यांची मोलाची मदत घडत आहे. त्यातील त्यांचे श्री बाबांचे जीवनावरील मार्मिक लेखन अत्यंत उपयुक्त असून श्री बाबांचे एक सांगोपांग प्रदिर्घ चरित्र त्यांच्या लेखणीतुन उतरल्यास श्री बाबांचे खरेखुरे व बरेचसे लपलेले दैवी सद्गुण सामर्थ्य सर्वासमोर प्रगट होऊ शकेल. प्रस्तुत पुस्तक समयीही त्यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले आहे.
भाविकांच्या सद्भावनेने घडलेली कार्ये
परमपूज्य श्री बाबांच्या दर्शनाने तृप्त झालेले भाविक आपणा प्रमाणेच इतरांसही त्यांच्या दुर्लभ सत्संगतीचा लाभ मिळावा म्हणुन आपल्या आजूबाजूस त्यांचे महात्म्य मोठ्या श्रद्धेने विविध मार्गांनी पोहोचवित असत. त्यातूनच नागपुरपत्रिका, युगधर्म वगैरे सुप्रसिद्ध मोठ्या दैनिकांतुन त्यांचे विशेष पुरवणी अंक प्रसिद्ध झाले. शिरडीचे श्री साईबाबा संस्थानचे मासिक श्री साईलीला, मुंबईचे श्री सुधाकर सामंत संपादित 'भक्तिसंगम', पुण्याचे वा. दा. धत्ते संपादित 'पिसार', आरोग्य वैभव, देवकीनंदन गोपाला (अमरावती),
श्री परमहंस पुंडलिक भक्तजन मंडळ संपादित ‘पुंडलिक दर्शन स्मरणिका’ यासारखे अनेक विशेषांक श्री बाबांचे महात्म्य सांगू लागले. खुद श्री पुंडलिक न मधुनही परमहंस मासिकाचे प्रकाशन भक्तासी नियमित सुखसंवाद साधू लागले. श्री. वि. मा हटवार (लहानुसुत) लिखित खास अंकही उल्लेखनीय होता.
चिखली, पथरोट,
नागपूर, अमरावतीत विनायक नगर, बुधवारा,
वलगांव रस्ता, वर्धा -
पुलगा जवाहरनगर, रत्नागिरीला
दापोलीतील करजगांवी, विव्हा मांडवा (पैठणजवळ),
तरनोळी (दारव्हा),
कारंजा जवळ मेहा, अकोल्याला राऊतवाडीत श्री बाबांची स्वतंत्र मंदिर उभारली गेली. अंजनगाव सुर्जी (दर्यापूर) प्रमाणे काही ठिकाणी त्यांच्या सुंदर भव्य मु्र्ती, तर कोठे बंगळीवर फोटो पादुकांची स्थापना करून भाविक पूजाअर्चा करु लागले नागपूर जवळील पारडसिंगा, कळमेश्वर,
आकोल्यातील, काटा,
मंगळूरनाथ, कुटासा,
सोनोरी बोपोरी, जुनुना, कामरगाव, सालतवाडा,
अमरावतीजवळचे टाकरखेडा (संभु) या सारख्या काही ठिकाणी भजनीमंडळे, दरबार सेवामंडळे, स्थापुन सामुदायिक उपासना सुरु झाल्या. यवतमाळचे तरनोळीला श्री पुंडलिकबाबा हायस्कूल, बुलढाणा नांदुर्याला परमहंस पुंडलिक बाबा महाविद्यालय, माळेगांव (अकोट) येथील श्री पुंडलिक बाबा हायस्कूल, पुंडलिकबाबा शिक्षण संस्था विवरा ता. पातुर (अकोला),
श्री पुंडलिक बाबा विद्यालय (देऊळगांव) अशी विविध शैक्षणिक केंद्रे तसेच दवाखाने, सांस्कृतीक
केंद्रे वगैरे सर्वसमाजोपयोगी संस्था पूज्य श्री बाबांचे नांव आपल्यासं संस्थेला देण्यात कृतार्थता मानू लागल्या.
मुर्तिजापूरच्या श्री पुंडलिक नगरमध्ये श्री परमहंस पुंडलिक बाबा संस्थानाचे महाद्वार श्रीमती सरस्वती उत्तमराव कोल्हे (उंबर्डा बाजार) व सौ. पंचफुलाबाई सोपानराव देशमुख (इच्छापूर) ,
विहिर श्री मनोहरपंत शंकरराव आलोणे (नेरपरसोपंत),
पाण्याची टाकी कै. नागोराव गोविंदराव राऊत, कै. राजेन्द्र बळवंत वानखडे (गोधणी),
श्री. बापुराव मारूतराव गोळे (पथ्रोड) व नागपूरचे लक्ष्मणराव जोशी व भक्तजन मंडळ, निवासस्थान,
कमलाबाई चंदनकर व लक्ष्मणराव घोटे (कुहीउमरेड) देवीदास बंड, सभामंडप श्री भुतडा परिवार (वरुड जऊळका ) गुरुकृपानिवास श्री सुदामराव तितरमारे, स्वयंपाकघर
श्री नारायणराव धांडे (माहुली),
शाळा सौ. काळमेघ (मुर्तिजापूर) शंकरमंदिर श्री प्रकाश गावंडे (बहिरखेड- अकोला),
श्री मारुती मंदिर-सार्वजनिक धर्मशाळा सार्वजनिक निधीतून, भांडे विभाग शामराव घाटे (राजूराघाटे),
तशीच चार छोटी निवासस्थाने दातळीकर मंडळी (सिन्नर) कृष्णराव चिव्हाणे, सौ. कांबळे (सांगली),
श्रावण मेश्राम कडू (कवठा) या सारख्यांनी अशी विविध सेवा समर्पण करुन श्री पुंडलिक संस्थानला आगळे -वेगळे रुप दिले. श्री आनंदराव घोटेंनी हजारो रुपयांची भांडी दिली.
दरवर्षी गुरुपोणिमिस, १ जानेवारीला श्रीखंडूनानांच्या पुण्यतिथी निमित्य व चैत्र शुद्ध पंचमीस श्री बाबांच्या जन्मोत्सव प्रसंगी हजारो भाविक श्री बाबांच्या दरबारी येऊन सर्व धार्मिक कार्ये व अन्नदानादी व्यवस्था सामुदायिक रुपे करतांना दिसून येतात.